सुरवातीला Hobbies काय, पुस्तकं वाचता का असे थोडे Harmless प्रश्न विचारून झाल्यावर मी जरा भीत-भीतच विचारले.. "स्वयंपाक कितपत येतो?" आज-काल असा प्रश्न विचारणं जरा प्रतिगामी समजलं जातं, पण मी सलग ४-५ वर्षं मेसचं जेवण जेऊनशान पुरता पकलो होतो, त्यामुळे निदान या बाबतीत तरी रिस्क घ्यायची तयारी नव्हती.
तिनं बेधडक "सगळं येतं" असं सांगितल्यावर तर अजूनच दचकलो..
गेल्या वर्षभरात माझी शंका पूर्ण फोल ठरली आहे. सौ. रोजचे पदार्थ तर एकदम चविष्ट करतेच, शिवाय अधून मधून निर-निराळे प्रयोग चालू असतात. ही पहा एक झलक...
पनीर टिक्का वडी ऒफ़ द खोबरं
माझा किचनमधला सहभाग फक्त मध्ये मध्ये कडमडणे, आणि डिश तयार झाल्यावर फोटो काढणे, एवढ्यावरच सीमीत असतो.