लग्न ठरण्याअगोदर मी व (
होणारी) सौ. भेटलो होतो.. उद्देश हा की जरा एकमेकांना समजून घ्यावं.
सुरवातीला Hobbies काय, पुस्तकं वाचता का असे थोडे
Harmless प्रश्न विचारून झाल्यावर मी जरा भीत-भीतच विचारले.. "
स्वयंपाक कितपत येतो?" आज-काल असा प्रश्न विचारणं जरा प्रतिगामी समजलं जातं, पण मी सलग ४-५ वर्षं मेसचं जेवण जेऊनशान पुरता पकलो होतो, त्यामुळे निदान या बाबतीत तरी रिस्क घ्यायची तयारी नव्हती.
तिनं बेधडक "
सगळं येतं" असं सांगितल्यावर तर अजूनच दचकलो..
गेल्या वर्षभरात माझी शंका पूर्ण फोल ठरली आहे.
सौ. रोजचे पदार्थ तर एकदम चविष्ट करतेच, शिवाय अधून मधून निर-निराळे प्रयोग चालू असतात. ही पहा एक झलक...
पनीर टिक्का वडी ऒफ़ द खोबरं
दहीवडा टोमेटो सूप
माझा किचनमधला सहभाग फक्त मध्ये मध्ये कडमडणे, आणि डिश तयार झाल्यावर फोटो काढणे, एवढ्यावरच सीमीत असतो.